Wednesday, July 9, 2014

आंदोलनाने काय साधले.. काय घडले ?

आंदोलनाने काय साधले.. काय  घडले ?
 मित्रानो,आपण ज्या प्रमुख मागण्या साठी आंदोलन केले त्या खऱ्याच साध्य झाल्या आहेत आणि ते काही दिवसात दिसेलही;
परन्तु काही लोकात गैरसमजातून एक निराशेची उद्विग्नेतेची लहर ही तयार झाली ह्याचे  कारण म्हणजे..
१.      मागण्याची पूर्तता आम्हाला ज्या स्वरुपात म्हणजे मंत्रिमंडळ मंजुरी/शासन निर्णय  या स्वरुपात हवी होती ती मिळता, आताही पूर्वीसारखे नुसते `शब्द बापुडे`  आहेत कि काय ही शंका ,
   मित्रानो, तसे नाही स्वतः मा. मुख्यमंत्री,मा.आरोग्यमंत्री आणि सचिव ह्यांनी 50 TV मेडिया समोर स्पष्ट आणि लेखी अभिवचन दिलेय आणि ठोस काम सुरु झाले सुद्धा आहे,ह्याची प्रचीती आपण आपापल्या DHO/CS/DDHS कार्यालयात सुरु झालेल्या हालचालीवरून लक्षात येईल .
. उद्विग्नेतेचे दुंसरे कारण म्हणजे अचानक घडलेल्या घडामोडी बाबत कुणाला स्पष्ट,सत्य आणि वास्तविकतेची माहिती नसणे,त्यामुळे का केले?असे का घडले?माघार घेतली का? मेस्माला घाबरले का ?हार झाली का?तहात चुकले का?. प्रश्न उठणे स्वाभाविक आहे.
अश्या प्रकारच्या संघर्षात निकाल हा संघर्षरत {आम्ही} संघर्षग्रस्त{संघर्षाने ग्रासलेले सरकार} ह्यांच्यावर मूलतः अवलंबून असतो .
संघर्षाची तीव्रता [ज्यात ह्यावेळी आपण कमी नव्हतो ]आणि त्याचवेळी सरकारची सदसद्विवेक बुद्धी ,संवेदनाक्षम असणे अत्यंत महत्वाचे असते.IT WAS TOTALLY ABSENT THIS TIME.
असे म्हटले जाते इंग्रज बरे कितीही जुलमी असोत पण ते विचारी आणि संवेदनाक्षम होते म्हणूनच आपल्याला स्वातंत्र्य मिळू शकले.थोडासा हिंसक उठाव बाकी अहिंसात्मक चळवळ मोडून काढायला इंग्रजांना अवघड नव्हते.आपल्या स्वातंत्र्यवीरांनी चिकाटीने हरता १८५७ ते १९४७ म्हणजे तब्बल नव्वद वर्षे संघर्ष केला अनेक  मोठे मोठे आंदोलने केली,ती सर्व निष्फळ होती का? नाही त्याची परिणीती म्हणूनच १५ ऑगष्ट १९४७ चा दिवस उगवला त्याच बरोर दुसया महायुद्धात इंग्रज खिळखिळे झाले होते हे ही तितकेच सत्य,ते विचारी विवेकी होते म्हणून त्यांनी हार मानून योग्य पावले उचलली. सागायचे तात्पर्य सरकार विचारी संवेदनाक्षम असणेही तितकेच महत्वाचे .
आपल्या आंदोलनात.. STATE MAGMO ने नियोजनपूर्वक आपली शक्ती एकवटून  ह्यावेळी सरकारला `अहिंसात्मक असहकार` प्रचंड आंदोलन पुकारून दाखवली ह्यात सर्वांचे योगदान मोलाचे होते. अशा एवढ्या मोठ्या आंदोलनापुढे कोणतेही संवेदनाक्षम विवेकी सरकार दखल घेऊन विवेकपूर्ण मार्ग काढून आपली चुणूक दाखवले असते परंतु सरकारातील काही - व्यक्तीने हा प्रतिष्ठेचा प्रश्न केला आणि ते सैरभैर झाले;अविवेकपूर्ण निर्णय घ्यायला लागले.     
नेमके काय घडत गेले …?
. नियोजनपूर्वक सर्व MOना करता येण्यासारखे म्हणजे यावेळी कुणालाही आझाद मैदानात गैरसोयीने थांबणे आणि आझाद मैदानात आल्या नंतर मागे सर्व सुरु असे होऊ नये म्हणून यावेळी सर्वजण जिल्ह्यातच  आणि तालुकानिहाय गट करून बंद ची पकड ठेवायला मदत झाली.AZAD मैदानातून माहिती , पुढची रणनीती कळवणे मत विचारणे आणि जिल्हातून MO चे मत अध्यक्षामार्फत घेऊन राज्य टीम ला देणे यासाठी काहीं संपर्क  पदाधिकारी नेमून JULY पासूनच आंदोलनाला धार आली . दररोज संध्याकाळी सकाळी आणि काही घडामोडी झाल्यास राज्याकार्याकारीनीची  आझाद मैदानातच  बैठक व्हायची,सर्वजण आपापल्याला वाटून दिलेल्या जिल्हाध्याक्षाना नियमितपणे संपर्कात राहून म्हाहिती देणें मत घेणे आणि ते ह्या बैठकीत सांगायचे एकमतानी निर्णय व्हायचा तसा सर्वाना त्याची म्हाहीती दिली जायची
.      MEDIA  व्यवस्थापने मुळे ह्यावेळी पहिल्या दिवसापासून आपले आंदोलन माध्यमात चर्चेत ठेवले. सरकारने सचिवामार्फत  चर्चा ठेवली ह्यात काही निष्पन्न झाले नाही उलट सरकार चातुर्याने फोडा आणि राज्य करा ह्या नीतीचा अवलंब करत होते आणि कोणत्याही मागणीला काहीही ठोस देत नव्हते.
पण अडून बसण्यासाठी सेवासामावेषण पूर्वलक्षी लाभ साठी MAGMO जास्त आग्रही बघून त्यांनी काही हि करून ती नाही म्हणायचे आणि बाकी मागण्या मान्य करतो, पण तुम्ही अडून बसलात अशी भूमिका घेतली , खरे तर तेच अडले होते आर्थिक बोजा ,लिहून दिले ,देता येत नाही , न्यायालयात नाही असे चुकीचे सांगत फासत गेले ,BACKDATED BENEFIT 90-174 कोटींचा बोजा आणि १७८४ कोटीची  Dynamic Assured Career Progressive Scheme (DACPS) चांगली आहे, ती मान्य करू ,आर्थिक बोजाची सबब खोटी होती हे उघडे झाले ,सेवासामावेशांचा मंत्रिमंडळ निर्णय २००९ मध्ये औरंगाबाद येथे झाला होता त्या दस्त/ CABINET NOTE मध्ये कुठे हि bond लिहून घेण्याची, अटी शर्थी   लावण्याची बाब नव्हती ,हि नंतर कुणाला तरी सुचलेली मुद्दामहून घुसेडलेली चुकीची बाब आहे जी गैर आहे. तुम्ही लिहून दिले तरच समावेशन अशी अट टाकल्यानंतर तसे देणे भाग पडले. आज हि ती मुल दस्त उपलब्ध करून बघावे ह्यात ह्या BOND, अटी शर्थी बाबी नाहीत ,करता येत नाहीत तर शिक्षक, कृषी अधिकारी ETC एवढेच काय ह्याधीची सेवासामावेषित MO ना ही BACKDATED लाभ मिळाला आहे.
पण सरकार मुद्दामहून हि मागणी अडून ठेवून चक्रयुहात फसले आणि इतर मागण्या मान्य करून घेण्यात आपण यशस्वी झालो. शेवटी ह्या मागणी बाबतही मा.मुख्यमत्र्यानीही magmoनी सुचवलेले ४ पर्याय पाठवून द्या विचारकरून एका निर्णय घेण्याचे ठोस अभिवचन दिलेच, न्यायालयात हि ४० सेवासामावेषित MOच्या प्रकरणात उच्च न्यायालय पर्यंत हे लाभ द्या असा निर्णय झाला आहे.
त्यानंतर मग दडपशाही करून भीती दाखवून आंदोलन हुसकावून लावण्यासाठी MESMA ची नोटीस आझाद मैदानात दिली नंतर सर्व जिल्ह्यात . माध्यमातही बातमी पसरली तोपर्यंत आंदोलनाने तीव्र स्वरूप धारण केले होते ते बघून इतर अधिकारी ,कर्मचारी कामगार ,त्यात राजपत्रित पासून ते खाणकामगार पर्यंतच्या संघटनांचे  राज्य प्रतिनिधी  आझाद मैदानात आले त्यांनी पाठींबा दिला आणि असा कायदा लाऊन सरकार हक्क हिरावून घेऊच शकत नाही असा सूर निघाला. संघटना आणि संघर्षाचे प्रतिक आदरणीय श्री. र.ग. कर्णिक सर खुद आझाद मैदानात येउन व्यासपीठावरून मार्गदर्शन केले आणि कार्यकारीणीनेही mesmaला दाद द्याची नाही असा निर्णय होऊन त्या नोटीसची आझाद मैदानातच होळी केली आणि राज्यभर होळी करायचा संदेश दिला ,ह्याचा अर्थ मेस्माला घाबरलो असा नाही.खाली MOना ही मेस्माला का घाबरायचे नाही ह्यासाठी काही तर्क दिले 1. मा. मुख्यमंत्री अश्याकाही भयंकर कार्यवाहीला मंजुरी देत नव्हते;तशी खात्रीलायक माहिती होती.2. कोणतेही विवेकी सरकार १२ हजार डॉक्टरना जेल मध्ये घालेल अशी शक्यता नव्हती 3.सरकारकडे तशी भक्कम पर्यायी सोय ही नव्हती कारण आमची एकता अभेद्य होती.4 राज्यातील सर्व संघटना आणि व्यक्ती आपल्या सोबत होते.महत्वाचे म्हणजे हि कार्यवाही ज्यांच्यामार्फत अंमलबजावणी केली जाणार होती ते dho,cs संघटना आपल्या बरोबर आले होते.5. राज्यात आतापर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणावर मेस्मा ची कार्यवाही करायची दुर्बुद्धी  वा हिम्मत कुणीही केली नव्हती आतापर्यंत; केवळ भीती दाखवून तडजोड केली जायची. ह्या आधारावर मेस्माच्या नोटीसची होळी करायला सांगितले होते.
 .        तारखेपर्यंत आंदोलनामुळे जनक्षोभ,काही ठिकाणी जनतेचा डॉक्टराविरुध्द असंतोष उफाळून आला,जनतेचे प्रचंड हाल होतायेत अशा बातम्या सुरु झाल्या, त्यात उत्तर महाराष्ट्रातील काही गंभीर रुग्णांना गुजरात मध्ये जावे लागले उपचारासाठी तशेच postmartem साठी शव गुजरात मध्ये नेली गेली असे हि ऐकण्यात आले; काही NGO आपल्यांविरुध्द आंदोलन करणार अश्या बातम्याही आल्या , उच्च न्यायालयात याचिकाही दाखल करणार {नतर केलीही } आपण ही  राज्यस्तरावरून वकिलांचा कायेदशीर सल्ला आणि वकील शोधून सर्व कल्पना देवून तयारी ठेवली.स्वत;हून न्यायालात जाणे अत्माघातकीचे ठरले असते कारण MARD आणि U.P. च्या डॉक्टरांच्या संपाबाबत उच्च न्यायालय जनतेच्या हिताच्या दृष्टीने `आधी संप मागे घ्यायला` आदेश दिला असता आणि सरकारचे आयतेच फावले असते.
.    आपल्याविरोधातील त्या व्यक्ती बिथरून  गेल्या आणि त्यांनी आपले सर्व प्रयत्न साम दंड वापरून सर्व मंत्रिमंडळाला पूर्ण विश्वास संपादून आणि मुख्यामन्त्र्यानाही हा भयानक कायदा खरोखरच अमलात आण्यासाठी रात्री १० वाजता स्वाक्षरी मिळवली. CS DHO संघटनेने सफशेल माघार घेतली स्वत;चा होऊ घातलेला संप हि करणार नाही, मागण्याही मागणार नाही आणि MAGMO च्या संपला दिलेला पाठींबा ही काढून सरकारच्या आदेशाची अंमलबजावणी करायाला  तयार झाले. तसे त्यांच्या संघटनेचे प्रतीनिधीनीच आझाद मैदानात येऊन सांगितले
 ह्या सर्व बाबी विविध पक्ष नेत्यांना विचारून , आणि मंत्रिमंडळातील मंत्रांनी हि सांगितले,`` दगडावर डोके फोडून घेतायेत `हा कचरा काढून ` देतो असे म्हणताहेत. हट्टाला पेटलेले आहे.`` सकाळी इथले आणि राज्यभर डॉक्टरवर खरोखर पोलीस कार्यवाही होणार. त्याआधीच या आधीच्या  पोकळ  नोटिस मूळेच MAX ADHOC ,BONDED , SENIOR ,SPECILIST रुजू झाले होते होत होते गुपचूप,आयुष,IPHS, ,जिल्हातान्त्रिक संवर्गातील BAMS तर  आधी पासून दगाफटका करून विरोधात काम करत होतेच  त्यामुळे GOVTला बळ मिळाले .
.   आपण किती जोशात बोललो तरी आपण काही सामान्य नागरिक नाहीत; व्यवस्थेत बांधले गेलेलो तसेच बहुतेक जण आपल्यावर कौटुंबिक जबाबदाऱ्या असणारेच आहेत. अश्या वर गुन्हा दाखल होऊन ,जेल नंतर बडतर्फी अशी कार्यवाही भोगायला किती लोक मागे राहिले असते? प्रत्येक जिल्ह्यातून पेटलेले २०-३० म्हटले तरी हजार एक आणि या हजारांची पुरती वाट लावणे अशक्य नव्हते,मागण्या राहिल्या बाजूला नंतर ह्यांच्या कार्यवाहीला कौटुंबिक जबादारी, गेलेली नोकरी, हा सर्व विचका झाला असता पदरात काही पडले नसते
कारण काही झाले तरी मी करणारच नाही अशी भूमिका घेतेलेले आणि त्यासाठी पूर्ण तयारी केलेलेशी वाद घालून काही उपयोग नव्हता .
सर्वजणांनी मिळून आझाद मैदानात तातडीची  बैठक झाली आणि निर्णय घेतला , शेवटचा प्रयत्न म्हणून मंत्री/मुख्यमन्त्री भेटून चर्चा आणि मार्ग काढण्याचे निर्णय घेण्याचे अधिकार - जणाला देऊन हे शिष्टमंडळ  सह्याद्रीवर दाखल झाले.
 राजपत्रित अधिकारी महासंघाचे सल्लागार श्री . दि. कुलथे  सर ह्यांनी तर पालक या नात्यानेच खूप महत्वपूर्ण भूमिका बजावली.
मा.मुख्यमंत्री : १ आंदोलनात काही वैद्यकीय अधिकारी , RBSK MO,सहभागी इतर कर्मचारी अधिकारी ह्यांच्यावरील कार्यवाही मागे घेणार
२.  सेवासमावेषित वैद्यकीय अधिकाऱ्यांना पूर्वलक्षी लाभ देण्याविषयी मी २०११ मध्येच पाचगणी येथे शब्द दिला आहे ,प्रशासनाच्या दृष्टीने त्रुटी दाखवल्याने हि मागणी प्रलंबित होती, संघटनेने आणि प्रशासनाने सुचविलेल्या ४ पर्याय पैकी एक पर्याय निवडून नियमात बसवून निर्णय घेऊन  पूर्वलक्षी लाभ देणारच .
३. अस्थायी BAMS गट ब  आणि BDS वैद्यकीय अधिकाऱ्यांचे समावेशन करणार.
४. वैद्यकीय अधिकारी आणि उच्च अधिकाऱ्यांना  उच्च वेतन {DACPS} मंजूर करणार .
५. BAMS गट अ वैद्यकीय अधिकाऱ्यांना पदोन्नती देणार
६.NPA ऐच्छिक करणार
७. सेवानिवृत्तीचे वय ५८ वरून ६२ करणार 
८. वैद्यकीय अधिकाऱ्यांचे कामाचे तास इतर राज्य आणि सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनानुसार ठरविणार त्यासाठी तितके वाढीव पदे निर्माण करणे आदी  तंत्त्रिक बाबी पूर्ण करून अंमलबजावणी करणार तसा समितीचा प्रस्ताव ही शासनास दाखल झालाही आहे.
९.२००६ पासून ६ वा  वेतन आयोग तूर्तास  अमान्य.
मा. मुख्यमंत्रांच्या मध्यास्थिने समंजस तोडगा काढून ५० माध्यमाच्या समोर सर्व मागण्याबाबत स्पष्ट भूमिका घेत टप्प्या टप्प्याने सर्व प्रश्न निकाली काढण्याचे अभिवचन मिळवून , आपण यशस्वी  झालो आहोत
अश्या प्रतिकूल परिस्थितीत मुख्यामन्त्राच्या हस्ते उपोषानार्थींचे उपोषण सुटून इतका गोड आणि सन्मान्यजन्य समारोप आपल्या आंदोलनाचा  झाला ह्याचे श्रेय सर्व, जिल्ह्यातील  वैद्यकीय अधिकारी, सर्व जिल्हा अध्यक्ष, सचिव त्यांचे सर्व सहकारी यांच्या महत प्रयत्न, STATE MAGMOअध्यक्ष सचिव, डॉ. राजेश गायकवाड सर  सरचिटणीस डॉ. रक्षमवार सर हे दिवस आझाद मैदानात उपोषण आणि जिद्दीला सलाम, सर्व STATE MAGMO पदाधिकारी, राजपत्रित अधिकारी महासंघाचे सल्लागार श्री . दि. कुलथे  सर,डॉ.आहेर सर,डॉ.कल्याणकर सर,डॉ.शिंदे सर, डॉ. विजय मोहिते सर ह्यांना आहे.
 आणि शेवटी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दाखवलेली समयसूचकता आणि न्याय बाजू पाहून या आंदोलनाचा यशस्वी शेवट केला.
पूर्ण आंदोलनात प्रसार माध्यमांनी सहकार्य केले आपली बाजू मांडलीAND THEY ARE NOW SOLID WITNESS WITH PROOF WHAT HAS BEEN ASSURED BY GOVT TO MAGMO ह्यासाठी त्यांचेही  आभार मानले पाहिजेत
मेस्मा लावून संप मोडीत काढला हा संदेश सर्व संघटनासाठीही पुढे घातक ठरला असता म्हणून काही पदरात पडून बिनशर्त किंवा हजारो  च्या आयुष्याचे मेस्मा आणि इतर गुन्हेखाली आणि बडतर्फी ह्याने वाटोळे करून घेण्यापेक्षा. दाहक वास्तविकतेची त्यात अडेलतट्टू शासनाची वास्तविक परिस्थिती माहिती नसल्याने गैरसमजातून उदासीनता येणे स्वाभाविक आहे; उदासीन होऊ नका, आपण गमावले काहीच नाही उलट आपली ताकत दिसली एकता आणि नियोजन आणि भरीव पदरात पडलेही आहे ते काळच तुम्हाला दाखवेल. आयुष्य हे असेच असते किती तरी लढाया लढाव्या  लागतील, मिळवता येईल पण आत्मघात करून घेण्यात काहीच शहाणपणाचे नव्हते असे वाटते.. पुनश्च सर्वांचे अभिनंदन अशीच एकता एकजुटता ठेवा हीच खरी शक्ती आहे

जय MAGMO