२०१४ वर्षारंभाची अगतिकता !(Learned Helplessness?!)
आपण किती कांगावा केला अगतिक झालो त्यामुळे परिस्थिती अनुकूल होत नसते.
ह्याचा अर्थ आदोलन काराचेच नाही किंवा तीव्र आंदोलन होऊ शकत नाही असे बिलकुल नाही! परंतु भावनेच्या भरात नियोजन,पूर्वतयारीशिवाय काही करणे अपयश देणारे ठरू शकते;कारण काळ बदलला आहे,व्यवस्था बदललीय.
प्रत्येकाच्या मनात सध्या काही प्रश्न रुंजी घालताहेत,डोके भंडावून सोडताहेत.
१. आतापर्यंत संघटना आपल्या नियमित इतिवृताद्वारे अमुक अमुक बाबी सकारात्मक, इतक्या प्रगतीपथावर इत्या. सागंत आले आणि अचानक `पेटवा आयुष्याच्या मशाली` हि काय भानगड आहे?आतापर्यंत सांगत आले ते चुकीचे होते का?
२. आणि आता आचारसंहितेच्या जवळ कसा पेटवायच्या मशाली आणि किती पेटतील ,भडका उडाला तर शासन जागे होईल मिणमिणत्या किरकोळ मशालीनी काळ रात्रीचा अंधार कसा जाईल?
३. आंदोलन करायचे तर आधीच का नाही केले ? वेळ का घालवला? आधीच करायला हवे होते,उशीर झालाय तरी परंतु आताही चालढकल का आंदोलनाला?
४. आता निर्णय लटकत आहे,आता आणि पुढे काय नियोजन रणनीति निश्चित आहे का ?आखली आहे का ?
(लोकसभेची आचारसंहिता गृहीत धरून)?
मित्रानो तुमच्या मनात उठलेल्या ह्या सर्व शंका प्रश्न जेंव्हा आम्हीच नमूद करतोय ,सागतोय ह्याचा अर्थ ह्याचा विचार झाला आहे ,ह्याचे उत्तरे,शंकांचे पूर्णपणे समाधानकारक निरसन आहे,परंतु काहीं ज्येष्ठ आता ह्या गोष्टीची उकल सार्वजनिक करणे किती योग्य व अयोग्य राहील ह्या द्विधेत आहेत त्यामुळे मला आता देता येत नाही,१-२ दिवसात स्पष्ट होईल तेंव्हा ह्या सगळ्या बाबी स्पष्ट करून सागता येतील .
एक मात्र खरे माग्मो टीम हि काठावरची टीम नाही त्यातील प्रत्येकजण ह्या न त्या प्रश्नाशी/मागणीशी त्या वेदनेशी प्रत्यक्ष जोडलेला; ती वेदना भोगत असलेला सहप्रवासी आहे. त्यामुळे जे प्रयत्न जी रणनीती चालू आहे ती पूर्णपणे योग्य आणि पूर्ण विचार करून यशप्राप्ती साठी कशी फलद्रूप होईल अशीच अमलात येत आहे ह्याची खात्री बाळगा !
गेल्या काही दिवसा पासून वैद्यकीय अधिकाऱ्याच्या मनात प्रचंड खळबळ सुरु आहे. गेल्या महिन्यात काही महत्वाच्या मागण्या `मंत्रिमंडळ निर्णय` या महत्वपूर्ण टप्प्यावर आहेत आणि अचानक एके रात्री माग्मोच्या फेसबुकवर अधिकृतरीत्या `काळ रात्रीची आणि आयुष्याच्या मशाली पेटवण्याचे `आह्वान झळकले आणि मग त्यादिवसापासून वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मनात काहूर माजले!
शंका,धाकधूक,भीती,वैताग,चीड,राग,अस्वस्थता आणि स्वतः एकट्याने काही करू शकत नसल्याची/करण्यासारखे नसल्याची हतबलतेचा उद्वेग अश्या भावनांच्या हलकल्लोळ चालू होता/आहे.
त्यात गनिमत संघटना तिकडे मुंबईत हि लढाई लढत लढत रोज क्रिकेट कोमेंट्री प्रमाणे न चुकता आपल्याला इत्यंभूत सर्व माहिती स्थिती कळवीत आहे म्हणून बरे नसता अस्वस्थेतेमुळेच कितींचा रक्तदाब वरखाली होत राहिला असता!
मित्रहो Martin Seligman ह्या एका महान अमेरिकन मानस शात्रज्ञाचा एक सुप्रसिध्द सिद्धांत आहे "learned helplessness" !आणि आताच्या आपल्या सर्वांच्या परिस्थितीला तंतोतंत लागू पडतो .
`` learned helplessness to be a psychological condition in which a human being or an animal has learned to act or behave helplessly in a particular situation — usually after experiencing some inability to avoid an adverse situation — even when it actually has the power to change its unpleasant or even harmful circumstance.`` आपण किती कांगावा केला अगतिक झालो त्यामुळे परिस्थिती अनुकूल होत नसते.
माग्मो ची हि पहिलीच मागणी आहे असे नाही गेल्या दीड दोन वर्षात वैद्यकीय अधिकाऱ्यांचे तब्बल १९ शासन निर्णय विना आंदोलन विना काहीं गैरमार्ग `देवाण घेवाण` करून संघटनेने पदरी पाडून घेतले आहेत त्यात ही आर्थिक फायद्याचे बरेच निर्णय होते , हे सर्व विसरता कामा नये !
काही मित्र, मागून कोण देते का? सहन करत कितीवेळ ?सहनशीलता संपली,धीर धरा, किती हे सहनशील राहणे इत्यादी प्रतिक्रिया वाचून हसावे कि रडावे कळत नाही. कारण त्यांना विचारले कि ठीकाय नका धरू धीर ,काय करता ,काही मार्ग आहे का ?
आंदोलन ? जहाल जळजळीत ?
पण माझ्याच `अंजन ` ह्या लेखात आंदोलनाची आत्मपरीक्षण आणि अंजन डोळ्यात गेल्यावर डोळे उघडले.
http://shekharmahabm.blogspot.in/2013/06/blog-post.htmlह्याचा अर्थ आदोलन काराचेच नाही किंवा तीव्र आंदोलन होऊ शकत नाही असे बिलकुल नाही! परंतु भावनेच्या भरात नियोजन,पूर्वतयारीशिवाय काही करणे अपयश देणारे ठरू शकते;कारण काळ बदलला आहे,व्यवस्था बदललीय.

जय MAGMO!