Monday, March 3, 2014

आगतिक नकारात्मकता टाळा!


                                                             आगतिक नकारात्मकता टाळा!


                  आपण सर्वजण खुप अगतिक झालो आहोत. रोजच्या रोज काय घडतेय ते नाही कळवले तरी बेचेन आणि रोज नित्य कळवले तरीही रोज काही तरी नवीनच सांगायला हवे प्रत्येकवेळी नवीन घडायला हवे अशी विचित्र अपेक्षा काहीं मंडळी करत आहेत! 
पूर्वी, काय घडतेय हे तर लांबची गोष्ट कोणता शासन निर्णय वैद्यकीय अधिकार्याला कळायचा नाही मिळायचा नाही ,आज माग्मो प्रत्येक पत्र,घडामोडी कळवते तरी काही लोक नकारात्मक!

तिथली परिस्थिती शासनाची विविध विभागांचे ह्या प्रश्नासाठीचा दृष्टीकोन आपली सगळ्याची कुठाराघात करण्याची शक्ती,एकता,निर्धार,अभ्यास इत्यादी सर्व गोष्टींचा विचार करूनच जे जास्तीत जास्त फलद्रूप होण्यासारखे इष्टतम मार्ग आहेत ते अनुसरले जाताहेत, 
गेल्या १-२ वर्षात तब्बल १९ शासन निर्णय ह्याच प्रयत्नवादातून पदरी पाडून घेतलेत हे लक्षात ठेवा !
परंतु मी पाहतोय काहीं मंडळी सतत विनाकारण नकारात्मक मते व्यक्त करताहेत, `` थकलो आम्ही,तेच तेच ऐकून , किती धीर धरायचा , काय हे ,तेच ते ,माग्मोच खेळ करतेय, कठोर निर्णय घ्या,सरकार खेळ्वतेय` इ.इ.``
सरकारची/ प्रशासनाची भूमिका मानसिकता आम्हाला ज्ञात नाही असे वाटते का?
असे मत व्यक्त करून ही मंडळी....
सर्वबाबींचा विचार करून निस्वार्थपणे अहोरात्र संपूर्ण शक्ती बुद्धी लाऊन ज्येष्ठांचा,सर्व तज्ञाचा,माहितगारांचा सल्ला विचारात घेऊन,आपले `संघर्षमुल्य` ओळखून प्रामाणिकपणे प्रयत्नरत लोकांचा नकळत हिरमोड निरुत्साह करत आहेत. 
ही मंडळी बेचेन आहेत अगतिक आहेत परंतू हे हि लक्षात घ्या प्रयत्नरत मंडळी ही त्या प्रश्नाची निगडीत, त्याच्या वेदना भोगणारी आहेत. त्यांना ही येनकेनप्रकारेण हे जिव्हाळ्याचे प्रश्न सोडवून घेणे त्यांचाही जीवनाचा प्रश्न आहे हे लक्षात घ्या . ,
काही मंडळी केवळ दुषणे देणे ,नाराजी व्यक्त करणे आणि करणाऱ्यांचा हिरमोड करण्यापलीकडे काही नाही करत ,
ठीकाय हे योग्य पाऊले नाहीत तर तुम्ही सुचवा काही, ते ही नाही ! काही चांगला दुसरा पर्यायही नाही त्यांच्याकडे ! 
आंदोलनची भाषा करणाऱ्यांनी परत शांत डोक्यानी आत्मपरीक्षण करावे, आपण दुसऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांसारखे एकासुत्रात सहजरीत्या बांधले जाणारे नाहीत प्रत्येकाचे मागण्या वेगळ्या , प्रश्न वेगळे ,त्यामुळे एकदुसऱ्यासाठी नोकरी पणाला लावण्या इतपत निर्धार नाही आपल्यात अजून! क्षुल्लक बाबीसाठी सुद्धा लोक, ह्याचा आमचा काही संबध नाही आम्ही का म्हणून संप करावे नोकरी पणाला लागली तर मग काय करतील हे विचार करा ,अर्धवट मागे केल्यासारखे लुटूपुटू ३-४ दिवसांचे आंदोलनाने आता काही ही निष्पन्न नाही होणार;उलट असे अर्धवट कमजोर संघर्ष झाले तर फार मोठे नुकसान होईल . कृपया हयाची जाणीव येण्यासाठी खालील लिंक क्लिक करून शांतपणे वाचा आत्मपरीक्षण करा .

http://shekharmahabm.blogspot.in/2013/06/blog-post.html

अशावेळी सर्वांनी अहोरात्र प्रामाणिकपणे प्रयत्नरत संघटनेच्या सोबत एकसुरात भक्कमपणे पाठीशी तन मन धनाने असायला हवे!
विचार करा ,यश आपलेच आहे! जय हिंद जय MAGMO