Tuesday, October 2, 2012

दिशाहीन होऊ नका..

                                        दिशाहीन होऊ नका..


प्रचंड घुसमटलेला,निराश,उद्विग्न, भविष्याच्या काळजीने चिंताक्रांत तरीही हतबल असा उच्च विद्याविभुषित  प्राणी म्हणजे वैद्यकीय अधिकारीच असू शकतो!
             शिक्षण घेताना मोठी मोठी स्वप्ने बघणारा तरुण सरकारी  अनास्थेच्या लाथाळ्या खावून आणि ग्रामिण भागातल्या उन्हाने रापून काळवंडलेला खप्पड म्हातारा दिसायला लागतो.सरकारी नोकरीच्या जोखडात न अडकलेल्या अलगदपणे स्वतःचा व्यवसाय करणाऱ्या वर्गमित्राच्या सौष्ठवपूर्ण संसाराकडे बघताना मनात तडफडतो,आतून जळजळतो आणि आणखीनच काळवंडतो! खाजगी व्यवसाय करणारे,वेळीच पदव्युत्तर शिक्षण घेऊन आपली टुमदार दवाखाने थाटून मिजास करण्याऱ्या मित्रांना टाळायला लागतो.आपल्या नशिबाला दोष देत चडफडतो.त्याची समव्यवसायी मित्र मंडळी त्यांच्या कमाईचे, संपादिलेल्या `यशाचे` बडेजावपणे वर्णन करून त्याला आणखीनच निराशेच्या गर्तेत ढकलतात आणि ``आम्ही कित्ती शहाणा तू कित्ती अयशस्वी ,सरकारी पगारी  एम. ओ.``असा प्रत्यक्ष न बोलता ही त्याला जाणवून देतात.त्यामुळे तो अजून चिडून जातो.त्यात आयुर्वेद वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नशिबी तर आणखीनच उद्विग्न करणारे प्रसंग येतात आणि मग सरकारी दुष्टचक्रात अडकल्याची  जाणीव त्याला अधिकच निराश आणि वैफल्य आणते. ....क्रमश:पुढे चालू ..

1 comment:

  1. Dear All m.o. as per discussion with Hon DHS madam all those willing to appear for in service PG net Exam fill their online application form before last date no of posts will be declared later form filling process is same as others. convey to all with best wishes Dr Rajesh

    ReplyDelete